जिल्हा न्यायालय येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

जिल्हा न्यायालय, येथे २१ जून रोजी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, यवतमाळ, जिल्हा वकील संघ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात न्यायिक अधिकारी, वकील व न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आनंद एल. यावलकर, जिल्हा न्यायाधीश-१ एस. यू. बघेले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव दीपक दाभाडे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय टी. जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वरिष्ठ प्रशिक्षक डॉ. सुप्रभा यादगिरवार यांनी योगाचे महत्त्व, त्याचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. तसेच विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. वकील नेहा मुलुंडे यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांनी योगाचे आरोग्यदायी फायदे आणि दैनंदिन जीवनातील त्याचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी नियमित योग करण्याची प्रतिज्ञा घेतली. सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर के. एम. मुंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या योग शिबिरात यवतमाळ मुख्यालयातील न्यायिक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी आणि वकील मंडळींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित