दारव्हा, दिग्रस येथील शासकीय आदिवासी वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सुरू

शैक्षणिक सत्र 2026-27 करिता दारव्हा येथील शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह तसेच दिग्रस येथील शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून अनुसूचित जमातीच्या पात्र विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन गृहपालांनी केले आहे. प्रवेशासाठी वर्ग 7 वी, 10 वी व 12 वी उत्तीर्ण अनुसूचित जमातीच्या विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांनी https://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावेत. दारव्हा येथील मुलींच्या वसतिगृहाची प्रवेश क्षमता 125 असून दिग्रस येथील मुलांच्या वसतिगृहाची प्रवेश क्षमता 75 आहे. वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना निशुल्क निवास व भोजन व्यवस्था, निर्वाह भत्ता, गणवेश भत्ता, शैक्षणिक साहित्याकरिता डीबीटीद्वारे आर्थिक सहाय्य तसेच शासनाच्या नियमानुसार विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार विविध अनुदानांची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या इच्छुक व पात्र विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता ऑनलाइन प्रवेश अर्ज भरून या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह, दारव्हा व शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह, दिग्रस यांच्या गृहपालांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती