जिल्हाधिकाऱ्यांकडून बेंबळा प्रकल्पाची पाहणी

जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाची जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज पाहणी केली. पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या विविध बाबींची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच प्रकल्पाच्या देखभाल, व्यवस्थापन, इमारत आणि प्रशासकीय कामकाजाबाबत आवश्यक सूचना दिल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, कार्यकारी अभियंता व्ही. ए. शिरभाते तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बेंबळा प्रकल्प हा जिल्ह्यातील महत्त्वाचा सिंचन प्रकल्प असून त्याच्या कार्यक्षमतेबाबत आणि व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती घेतली

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती