कौशल्य विकास धोरणाबाबत सुचना, हरकती कळविण्याचे आवाहन धोरण

यवतमाळ, दि. 4 (जिमाका) : राज्याचे कौशल्य विषयक धोरण तयार करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने दि. 13 जुन 2024 च्या शासन निर्णयान्वये मा. आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. कौशल्य विकास धोरणाची एकंदरीत व्याप्ती विचारात घेता या कामकाजासाठी तात्पुरत्या स्वरुपात संबंधित विषयाचे विशेषज्ञ म्हणून एम/एस केपीएमजी ॲडव्हिसरी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधितानी कौशल्य धोरणाचा सुधारित प्रारूप मसुदा सादर केला आहे. दि. 24 फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या नियामक समितीच्या बैठकीत मा. अपर मुख्य सचिव यांनी दिलेल्या सूचना विचारात घेवून धोरणाचा प्रारूप मसुदा महास्वयम पोर्टलवर नोटीस सेक्शनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्याच्या कौशल्य विषयक धोरणाबाबत आपल्या सूचना, अभिप्राय, हरकती, सुधारणा इ. दि.6 मार्च पर्यंत विहित नमुन्यात लेखी स्वरुपात mhskillpolicy@mssds.in या इमेल आयडीवर कळविण्यात याव्यात. त्याअनुषंगाने कौशल्य धोरणाचा प्रारूप मसुदा महास्वयम पोर्टलवर नोटीस सेक्शनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. यास्तव, कृपया महास्वयम पोर्टलवर नोटीस सेक्शनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या कौशल्य धोरणाचा प्रारूप मसुद्याचे अवलोकन आपले स्तरावर करुन आपल्या काही सूचना, अभिप्राय, हरकती, सुधारणा असल्यास विहित नमुन्यात लेखी स्वरुपात mhskillpolicy@mssds.in या इमेल आयडीवर तसेच या कार्यालयाचे yavatmalrojgar@gmail.com ईमेल आयडीवर कळविण्याचे आवाहन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुशिल दि. उचले यांनी केले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती