विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढा ; समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांचे महाविद्यालयांना आवाहन

यवतमाळ, दि. 5 (जिमाका) : जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज 15 मार्चपर्यंत निकाली काढा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांनी महाविद्यालयांना केले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती आणि अनुदान योजना राबविण्यात येतात. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रदान योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती , व्यावसायिक पाठ्यक्रमांसोबत संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना सन 2018-19 ते 2023-24 या कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित आहेत. महाडीबीटी तांत्रिक कक्षामार्फत विद्यार्थी स्तरावरील अर्ज महाविद्यालय लॉगिन मध्ये पडताळणी (स्कृटिनी) या पर्यायामध्ये उपलब्ध केलेले आहेत. यामध्ये 15 मार्चपर्यंत असे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याकरिता मंजूर किंवा नामंजूर असे दोनच पर्याय प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. महाविदयालय स्तरावर प्रलंबित असलेले शिष्यवृत्तीस पात्र असलेले अर्ज मंजुरीकरिता त्वरित या कार्यालयात सादर करावे व अपात्र अर्ज नामंजुर करण्यात यावे. सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी अंतिम मुदत 15 मार्चपर्यंत देण्याम आली आहे. या तारखेनंतर अर्ज विचारात घेतले जाणार नाही व याबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चिीत करण्यात येईल ही महत्त्वाची बाब लक्ष्ररत घेवून प्रलंबित अर्ज निकाली काढावेत, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती