जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार
अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की
यवतमाळ, दि. 11 (जिमाका) : जिल्हा परिषदच्या स्वउत्पन्नाचे सन 2025-26 या आर्थिक वर्षाचे सुधारित तसेच सन 2026-27 या आर्थिक वर्षाचे मूळ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक उद्या दि. 12 मार्च रोजी मंजूर व प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
ही अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक पुस्तिका गुरुवारी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद यवतमाळ येथील श्री. वसंतराव नाईक सभागृहात आयोजित कार्यक्रमात मंजूर व प्रसिद्ध करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासक) मंदार पत्की हे भूषविणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या मागील वर्षातील उत्पन्न तसेच सन 2026-27 या वर्षात विविध विभागांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या योजना व मंजूर तरतुदीच्या अनुषंगाने हे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.
या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी दिली आहे.

Comments
Post a Comment