पारधी विकास योजनेंतर्गत वैद्यकीय, इंजिनीअरींगच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉपसाठी अर्थसहाय्य
१७ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 16 (जिमाका) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा यांच्यामार्फत पारधी समाजातील वैद्यकीय, इंजिनीअरींग व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉपसाठी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. त्यासाठी १७ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पारधी विकास योजनेतंर्गत विविध योजनेसाठी पारधी जमातीच्या लाभार्थ्यांकडून दि. 10 जून 2025 रोजी 5 व पुनश्च 31 ऑगस्ट 2025 रोजी 5 वाजेपर्यंत अर्ज आमंत्रित करण्यात आले होते. परंतु लक्षांकाचे अपरोक्ष पर्याप्त अर्ज प्राप्त न झाल्याने पारधी समाजातील वैद्यकीय, इंजिनीअरींग व इतर व्यावसाईक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉपसाठी अर्थसहाय्य करणे ही योजना राबविण्यात येत असून लाभार्थी संख्या 5 आहे. या योजनेचे अर्ज पुनश्च प्रकल्प कार्यालय पांढरकवडा येथे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. अर्ज प्रस्ताव स्विकारण्याची अंतिम मुदत दि. 17 मार्च 2026 रोजी 5 वाजेपर्यंत असून, या योजनाचे अर्ज प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा या ठिकाणी स्विकारले जातील.
पात्रता :
शैक्षणीक सत्र 2024-25 किंवा 2025-26 मध्ये पारधी समाजातील वैद्यकिय, इंजीनीअरींग व इतरव्यावसाईक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना च सदर योजनेचा लाभ देण्यात येईल.
‘ही’ कागदपत्रे :
योजनेसाठी जातीचा दाखला छायांकीत प्रत, रेषणकार्डची छायांकीत प्रत, आधारकार्डची छायांकीत प्रत, बँक पासबुकची छायांकीतप्रत, अर्जदाराचे दोन पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला, मागील उत्तीर्ण वर्षाची गुणपत्रीका, टि.सी व शिक्षण घेत असलेल्या महाविदयालयाचे बोनाफाईड सर्टिफीकेट अनिर्वाय आहे.
अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 07235-227436 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा यांनी केले आहे.
Comments
Post a Comment