वणी येथे आदिवासी मुलांच्या वसतीगृहासाठी इमारतीची आवश्यकता

यवतमाळ, दि. 17 (जिमाका) : शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह वणी येथील विद्यार्थ्यांच्या निवासासाठी 50 खोल्यांची स्वतंत्र इमारत भाडे तत्त्वावर घेण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. नवीन इमारतीसाठी अपेक्षित सुविधा असाव्यात. त्यामध्ये 250 विद्यार्थ्यांना पुरेल इतक्या 50 खोल्यांचे 10X10 बांधकाम असावे, एक कार्यालय असावे, स्वयंपाक गृह, भोजन कक्ष, कोटीगृह, 25 स्नानगृहे, 25 शौचालय, विद्युत व्यवस्था, पाण्याची मुबलक व्यवस्था, इमारत सुस्थितीत असणे आवश्यक आहे. भाडे व कर सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरविल्याप्रमाणे राहील. इच्छुकांनी 23 मार्च 2026 पर्यंत कागदपत्रासह कार्यालयीन वेळेत प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन वणीचे शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

Comments