एलपीजी गॅस सिलेंडरची प्रतिक्षा संपणार

बुकिंगनंतर ८ दिवसात ग्राहकाला सिलेंडर उपलब्ध करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी घेतला एलपीजी गॅस सिलेंडर वितरकांकडून आढावा यवतमाळ, दि.१८ (जिमाका) : मध्यपूर्व आशिया, अमेरिका व युरोपियन खंडात सध्या सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात कार्यरत असलेल्या भारत पेट्रोलियम (बीपीसीएल), हिंदूस्थान पेट्रोलियम (एचपीसीएल) व इंडियन ॲाईल (आयओसीएल) या तीनही कंपन्यांच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या वितरकांची जिल्हाधिकारी विकास मीना यांनी मंगळवारी बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्ह्यामध्ये एलपीजी गॅस सिलेंडर साठा पुरेसा उपलब्ध असून नागरिकांना बुकिंगनंतर लवकरात लवकर फर्स्ट इन फर्स्ट आऊट ऑर्डरनुसार सिलेंडर उपलब्ध होईल. तसेच गॅस एजन्सीवर गर्दी होऊ नये यासाठी टोकन सिस्टीम लागू करावी तसेच बुकिंगनंतर ८ दिवसाच्या आत ग्राहकाला सिलेंडर उपलब्ध होईल, असे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी संबंधितांना सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा करण्यात येईल. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच ऑईल कंपनी मिळून जिल्ह्यातील एलपीजी गॅस सिलेंडर साठा पुरेसा उपलब्ध राहील याबाबत कटीबध्द आहे. त्यामुळे गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी टाळावी तसेच अफवा वर विश्वासू ठेवू नये. सिलेंडरच्या वितरणात अडचणी उद्भवल्यास तात्काळ संबंधित तालुक्यातील अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने अधिकाऱ्यांचे तालुकानुहाय संपर्क क्रमांक जारी केले आहे. यवतमाळ तालुक्यासाठी मिथुन ठाकरे 9763050795 व सीमा दोंदल 8459142150, दारव्हा तालुक्यासाठी सत्यवान बांते 8806863394 व तुषार राठोड 9767254228, दिग्रस तालुक्यासाठी आतिफ हक 9604476734 व सत्यवान बांते 8806863394, वणी तालुक्यासाठी विवेक पांडे 9823449044 व विशाल कांबळे 8104968576, आर्णी तालुक्यासाठी जिवन राठोड 9096661506, बाभुळगाव तालुक्यासाठी मंगेश गाढवे 9890950991, घाटंजी तालुक्यासाठी किरण मस्के 9405163924, कळंब तालुक्यासाठी संध्या मनवर 9689722625, केळापुर तालुक्यासाठी कांचन कामडे 9765907892, महागाव तालुक्यासाठी मोहन कोल्हे 7678822670, मारेगाव तालुक्यासाठी विजय मत्ते 8605752141, नेर तालुक्यासाठी पूनम खांडेकर 9322014314, पुसद तालुक्यासाठी अमोल महाजन 9096860487, राळेगाव तालुक्यासाठी चंद्रकांत पाटील 9730632566, उमरखेड तालुक्यासाठी अमोल महाजन 9096860487, झरी जामणी तालुक्यासाठी नम्रता पारतकर 7722080847 यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी विकास मीना यांनी एलपीजी गॅस पुरवठ्यासंदर्भात क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. “जिल्ह्यात एलपीजी गॅस सिलेंडर तुटवड्याची कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतत दक्ष राहावे. प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात गॅस सिलेंडर पुरवठ्याच्या स्थितीवर बारकाईने आणि सातत्याने लक्ष ठेवावे. गॅस वितरकांशी नियमित समन्वय साधून मागणी व पुरवठ्याचे निरीक्षण करावे, तसेच आवश्यकतेनुसार तात्काळ दुरुस्तीत्मक उपाययोजना कराव्यात. तसेच गॅस पुरवठ्यात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास किंवा नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्या तातडीने सोडवाव्यात”, असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले आहेत.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती