महाराजस्व समाधान शिबिराला पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांची भेट

नागरिकांना विविध लाभाचे वाटप राज्य शासनाच्या महसूल विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात ७ मार्चपासून राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचा दुसरा टप्पा १४ मार्च रोजी सर्व तालुक्यात उत्साहात पार पडला. या अभियानांतर्गत नेर तालुक्यातील मोझर येथे आयोजित महाराजस्व समाधान शिबिराला पालकमंत्री ना. संजय राठोड आणि जिल्हाधिकारी विकास मीना यांनी भेट देवून लाभार्थ्यांना विविध लाभाचे वाटप केले. या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला. महसूल विभागाशी संबंधित अनेक प्रश्नांचा तत्काळ निपटारा देखील करण्यात आला तसेच नागरिकांना शासनाच्या विविध योजना, नवीन कायद्यांबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी, मोझर मंडळ परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित