कृषी प्रदर्शनीला जिल्हाधिकारी विकास मीना यांची भेट
सेंद्रिय शेती पद्धतीतून निर्मित वस्तू, बीबियाणे, शेत अवाजारे आणि खाद्यपदार्थांच्या स्टॅाल्सची केली पाहणी
यवतमाळ, दि. ३० (जिमाका) : यवतमाळ येथील कृषी विज्ञान केंद्र मैदान पिंपळगाव रोड येथे आयोजित ‘यवतमाळ महोत्सवा’त जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत कृषी प्रदर्शनी भरविण्यात आली आहे. या पारदर्शनीला जिल्हाधिकारी विकास मीना यांनी काल भेट देवून सेंद्रिय शेती पद्धतीने निर्मित केलेल्या वस्तू, बीबियाणे, शेत अवाजारे व यंत्र आणि सेंद्रिय खाद्यपदार्थांच्या स्टॅाल्सची पाहणी केली.
यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, शेतकरी बांधव उपस्थित होते. या प्रदर्शनी दरम्यान शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या ट्रॅक्टरची प्रतिकात्मक किल्ली जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आली.
या कृषी प्रदर्शनीमध्ये स्थानिक शेतकरी उत्पादक संस्था आणि कंपन्यांकडून सेंद्रिय पद्धतीने निर्माण केलेले गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, मसाले, फळ भाजीपाला इ. प्रदर्शित करण्यात करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनाला शेतकरी, महिला आणि नागरिकांनी भेट देवून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.





Comments
Post a Comment