जागतिक ग्राहक हक्क दिन’ उत्साहात साजरा
निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
यवतमाळ, दि. 16 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे १६ मार्च रोजी “जागतिक ग्राहक हक्क दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर. यु. मराठे, सदस्या जिल्हा ग्राहक आयोग वनमोरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष राजेंद्र निमोदीया, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष अनंत भिसे तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहायक व्यवस्थापक अक्षय जयस्वाल उपस्थित होते.
पुरवठा निरीक्षक सीमा दोंदल यांनी प्रस्ताविक केले. संजय जोशी यांनी ग्राहकगीत सादर केले. उपस्थित मान्यवरांनी ग्राहक हक्कांविषयी मार्गदर्शन करत जनजागृती केली. पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी प्रणय ईतकर यांनी सायबर गुन्ह्यांबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. तसेच आरोग्य विभागातील डॉ. विशाल टावरी यांनी आयुष्यमान भारत कार्डाबाबत मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त २४ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत स्वाती सोनूले आणि विद्या जाधव यांना प्रथम क्रमांक मिळून प्रत्येकी २ हजार ५०० रुपये पारितोषिक देण्यात आले. राजनंदिनी चव्हाण, द्वितीय क्रमांकासाठी २ हजार रुपये पारितोषिक देण्यात आले. तसेच अंजली धनगर, वैष्णवी गुडुप आणि तनुजा कानकिरड यांना तृतीय क्रमांकासाठी प्रत्येकी १ हजार रुपये पारितोषिक देण्यात आले. एकूण ६ विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले, तर १५ विद्यार्थिनींना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
ग्राहक हक्कांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन विभाग, वैद्यमापन शास्त्र विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, भारत संचार निगम लिमिटेड, स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा यवतमाळ आणि कृषी विभाग यांच्या वतीने विविध प्रदर्शने आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरणा अभ्यंकर व छाया गुघाने यांनी केले. आभार प्रदर्शन निरीक्षण अधिकारी मिथुन ठाकरे यांनी केले.
जिल्हा पुरवठा अधिकारी संघपाल मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभांगी कुंभेकर, गिरीधर कारणकर आणि विष्णु डोळसे यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment