भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा अॅडव्हायझरी जारी ! हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

यवतमाळ, दि. 4 (जिमाका) : केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या मार्गदशक सुचनेनुसार मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा अॅडव्हायझरी जारी केली आहे. त्या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या 24X7 हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क असून केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आपत्कालीन संपर्क तपशील एसइओसी (24X7) राज्य आपात्कालीन परिस्थिती किंवा परदेशातील व्यक्तींच्या सुरक्षतेबाबत माहीती देण्यासाठी नागरिकांनी खालील एसइओसी क्रमांकावर संपर्क साधावा. टोल फ्री क्र. 1077 फोन न. - 91-9321587143 कार्यालयीन क्र. 022-22027990 ई-मेल आयडी- controlroom@gov.in रामल्लाह (पॅलेस्टाईन) फोन: +970592916418 ईमेल: repoffice@mea.gov.in/cons.ramallah@mea.gov.in दोहा (कतार) फोन: 00974-55647502 ईमेल: cons.doha@mea.gov.in रियाध (सौदी अरेबिया) फोन: 00-966-11-4884697 WhatsApp: 00-966-542126748 टोल फ्री: 800 247 1234 ईमेल: cw.riyadh@mea.gov.in तेल अवीव (इस्रायल) फोन: +972-54-7520711/+972-54-2428378 ईमेल: cons१.telaviv@mea.gov.in तेहरान (इराण) फोन: +989128109115/+989128109109/+989128109102/+989932179359 अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात) टोल फ्री: 800-46342 WhatsApp: +971543090571 ईमेल: pbsk.dubai@mea.gov.in/ca.abudhabi@mea.gov.in कुवैत फोन: +96565501946 ईमेल: community.kuwait@mea.gov.in बाहरीन फोन: 00973-39418071 मस्कत टोल फ्री : 80071234 WhatsApp: +96898282270 ईमेल: cw.nmuscat(@mea.gov.in/cons muscat@mea.gov.in जॉर्डन फोन: 00962-770 422 276 बगदाद (इराक) फोन: +964 771 651 1185/+964 770444 4899 वेबसाइट : eoibaghdad.gov.in ईमेल:cons.baghdad@mea.gov.in/consl.baghdad@mea.gov.in/pol.baghdad@mea.gov.in परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आवश्यक सूचना सुरक्षीत ठिकाणी राहावे आणी अनावश्यक हालचाल टाळावी. भारतीय दुतावास / कॉन्सथयुलेटच्या अधिकृत सुचनांचे पालन करावे. आपले लोकेशन व स्थिती कुटुंबियांना सतत कळवावी. मोबाईल चार्ज ठेवावा व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी. सोशल मिडीयावर अफवा, अप्रमाणित संदेश किवा चुकिची माहीती पसरवू नये. स्थानिक भारतीय दुतावासाकडे नोंदणी करणे अत्यावश्यक भारत सरकारचे इएमए व महाराष्ट्र शासन एकत्रितपणे परदेशात अडकलेल्या नागरिकांचे सुरक्षिततेवर 24X7 लक्ष ठेवून आहेत, नागरिकाचे सरंक्षण, माहीती समन्वय, आवश्यक ती मदत आणी परिस्थितीनुसार स्थाणामा भर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. त्या अनुषंगाने अधिक माहीतीसाठी फोन न- ०७२३२-२४०७२०, ८९९९२५७५३६ जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हा कार्यालय यवतमाळ किंवा ०७२३२-२५६७००/८८५६८५८९३२ जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाचे वतीने करण्यात येत आहे. 000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती