महिला स्वयंसहाय्य बचत गटांच्या उत्पादनासाठी माविमची ‘नवतेजस्विनी प्रदर्शनी’

७६ स्टॉल्सच्या माध्यमातून गृहोपयोगी वस्तू, कडधान्य, शोभिवंत वस्तू, खाद्यपदार्थ विक्रीस यवतमाळ, दि.३० (जिमाका) : राज्य शासनाच्या विविध जिल्हास्तरीय कार्यालयांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित पाच दिवसीय यवतमाळ महोत्सवात महिला स्वयंसहाय्य बचत गटांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) मार्फत ‘नवतेजस्विनी प्रदर्शनी’ भरविण्यात आली आहे. या प्रदर्शनीमध्ये जिल्ह्यातील ७६ महिला स्वयं सहाय्य बचत गटांनी सहभाग घेतला असून या मध्ये गृह उपयोगी वस्तू, कडधान्य, बांबू उत्पादने, माती ची भांडे, विविध धान्ये, शोभिवंत वस्तू, खाद्यपदार्थ अशी विविध उत्पादने खरेदी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. महिला स्वयं सहाय्य बचत गटांनी निर्मित उत्पादने जास्तीत जास्त खरेदी करावे, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. यासोबतच, खाद्यपदार्थांची आवड असलेल्या खाद्यप्रेमींसाठी ‘खाद्य जत्रा’चे आयोजन करण्यात आले आहे. या खाद्य जत्रेत अससल मराठी खानावळींचे खाद्यपदार्थ विक्रीसाठी स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या ‘खाद्य जत्रा’ला खवय्यांनी आणि यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी भेट देवून खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्ययात आले.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती