नेर तालुक्यात मतदार यादी पुनरीक्षण कामाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

यवतमाळ : जिल्हाधिकारी विकास मीना यांनी काल नेर तालुक्याला भेट देऊन मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी त्यांनी उपस्थित सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी (AERO), बीएलओ सुपरवायझर तसेच बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. तसेच मतदार यादी पुनरीक्षणाची कार्यपद्धती, नोंदणी प्रक्रिया आणि प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.

मतदार यादी पुनरीक्षणाचे काम निर्धारित वेळेत आणि अचूकपणे पूर्ण व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. 

तसेच कामामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये आणि प्रत्येक पात्र मतदाराची नोंद सुनिश्चित करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती