शासकीय तंत्रनिकेतन १८१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

 

यवतमाळ,दि. १ (जिमाका) : यवतमाळमधील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध नामांकीत कंपन्यांच्या प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये शासकीय तंत्रनिकेतनच्या विविध अभियांत्रिकी शाखेतील १८१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

 

बजाज ऑटो लिमिटेड (पुणे)टाटा मोटर्स लि. पुणेडाटा स्टाक प्रा. लि. पुणे, आव्हाडा ग्रुप नोइडा व टाटा गोशनग्रीन एनर्जी पुणे ह्या कंपन्या प्लेसमेंट ड्राईव्ह करीता शासकीय तंत्रनिकेतनयवतमाळ येथे आल्या होत्या. या प्लेसमेंट ड्राईव्हच्या निवड प्रक्रियेत सर्वप्रथम बुद्धीमत्ता चाचणी व मुलाखत घेण्यात आली.

 

या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये बजाज ऑटो लिमिटेड (पुणे) साठी अणुविद्युत, विद्युत व यंत्र अभियांत्रिकी विभागातील एकूण ४२ विद्यार्थी निवडले गेले. टाटा मोटर्स लि. पुणे या कंपनीत कमवा आणि शिका ह्या योजनेअंतर्गत यंत्र अभियांत्रिकी विभागातील ७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विशेषतः टाटा मोटर्स लि. पुणे मार्फत या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षण मोफत देण्यात येणार असून वेतन सुद्धा देय राहील. डाटा स्टाक प्रा. लि. पुणे या कंपनीने प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत संगणक अभियांत्रिकी मधील ४ विद्यार्थ्यांची निवड केली. आव्हाडा ग्रुप नोइडा या कंपनीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकीमधील ११ विद्यार्थीनी व विद्युत अभियांत्रिकी मधील ९ विद्यार्थीनींची निवड झाली. तसेच टाटा गोशनग्रीन एनर्जी पुणे येथे यंत्रअणुविद्युत व विद्युत अभियांत्रिकी विभागातील एकूण १०८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

 

या प्लेसमेंट ड्राईव्हच्या आयोजनाकरीता संस्थेचे प्राचार्य अ.पु. मटाले यांच्या मार्गदर्शनात सर्व विभाग प्रमुखट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी पी. एम. जाधव व संस्थेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित