दहावी, बारावी पास भटक्या विमुक्त मुलामुलींसाठी पुण्यात मोफत नर्सिंग कोर्स
यवतमाळ, दि.10 (जिमाका) : पुणे येथील टिळक विद्यापीठामार्फत भटक्या विमुक्त मुलामुलींसाठी नर्सिंग कोर्स सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १७ वर्ष पूर्ण असलेल्या इच्छुक भटक्या विमुक्त मुलामुलींनी इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन सहायक संचालक ओमप्रकाश नगराळे यांनी केले आहे.
भटक्या विमुक्त मुलामुलींसाठी पुणे येथील
टिळक विद्यापीठ गेल्या दोन वर्षांपासून नर्सिंग कोर्स यशस्वीपणे राबवित आहे. निराधार,
गरजू आणि पुढील शिक्षण घेण्याची तयारी नसलेल्यांसाठी या विद्यापीठ मान्य प्रमाणपत्र
कोर्सद्वारे चांगली नोकरी मिळवून देत आहेत. सध्या देश-विदेशात नर्सिंगची प्रचंड मागणी
असून एका वर्षात १०० टक्के नोकरी मिळत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या नर्सिंग कोरिससाठी अर्जासोबत आधार कार्ड,
उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, १०
वी किंवा १२ वीची गुणपत्रिका आदी कागदपत्रे जोडावीत. वय १७ वर्षे पूर्ण असलेल्या व
नर्सिंग कोर्ससाठी पात्र व इच्छूक असलेल्या विद्यार्थिनींनी कार्यालयीन वेळेत सहायक
संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, यवतमाळ यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे
आवाहन सहायक संचालक ओमप्रकाश नगराळे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment