विशेष लोकअदालतीत 121 प्रकरणे निकाली

       यवतमाळ, दि. 20 (जिमाका) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार 18 जुलै  रोजी  जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीत एकूण 121 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली.

 हा उपक्रम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आनंद एल यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.जिल्हयातील सर्व तालुका न्यायालयामध्ये धनादेश अनादर चेक बाऊस प्रकरणासाठी  विशेष लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते.

  या विशेष लोकन्यायालय यशस्वी होण्यासाठी वकील आणि बॅंकेचे अधिकारी यांच्यासोबत पुर्वनियोजित बैठका घेण्यात आल्या. तसेच  जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायाधीशांसोबत आभासी पध्दतीने संवाद साधून नियोजन करण्यात आले. या विशेष लोकअदालत मध्ये पक्षकारांना स्वच्छेने व सामंजस्याने वाद अंतिम रित्या मिटविता येते याची खात्री पटल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण १२१ प्रलंबित प्रकरणे विशेष लोकअदालतमध्ये आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. या माध्यमातून निकाली निघालेल्या प्रकरणांचे एकूण तडजोड मुल्य २ कोटी २९ लाख १९ हजार २३३ रूपये इतके होते.

  या विशेष लोकअदालतमुळे संबंधित पक्षकारांचा वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होऊन न्यायदानाची प्रक्रिया अधिक सुलभ व जलद होते. या विशेष लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा व तालुका न्यायालयातील न्यायाधीश, जिल्हा न्यायालयाचे अधिक्षक, व्यवस्थापक, अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव दिपक एच. दाभाडे यांनी या विशेष लोकअदालचे यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित