झरी जामणीतील प्रस्तावित कोळसा खाणीसंदर्भात जनसुनावणी

                                      जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या ग्रामस्थांच्या समस्या

            यवतमाळ दि. 24 (जिमाका):  झरी जामणी तालुक्यात मे. नीळकंठ इन्फ्रा मायनिंग लिमिटेड द्वारा प्रस्तावित मार्की-झरी-जामणी-अडकोली कोळसा खाणीसंदर्भात जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणी अडकोली येथे गुरुवारी पार पडली.

            महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक कार्यालय चंद्रपूर यांच्यावतीने आयोजित या जनसुनावणीला उपविभागीय अधिकारी रेवैयाह डोंगरे, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, कंपनीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 



            या पर्यावरणीय जनसुनावणीत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी नागरिकांच्या तक्रारी, समस्या, सूचना जाणून घेतल्या. तसेच त्यातील ग्राह्य सूचनांवर योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे ते म्हणाले.

            ही कोळसा खाण झरी जामणी तालुक्यातील अडकोली, पवनार आणि गणेशपूर खुर्द या गावात प्रस्तावित असून येथील उत्पादन क्षमता १.२५ दसलक्ष टन प्रति वर्ष कोळसाकरिता खाणपट्टा क्षेत्र ३५३.५० हेक्टर प्रकल्पाच्या प्रस्तावाबाबत ही पर्यावरणविषयक जनसुनावणी पार पडली.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित