‘अमृत-सक्षम’ उपक्रमातून कचरा व्यवस्थापन क्षेत्रात उद्योजक होण्याची संधी
अमृत संस्थेचा विशेष उद्योजकता विकास उपक्रम सुरु
यवतमाळ,
दि. 17 : महाराष्ट्रात आता कचरा व्यवस्थापन हे केवळ स्वच्छतेचे काम राहिलेले नाही,
तर ते वेगाने वाढणारे 'हरित उद्योग' क्षेत्र बनले आहे. वाढते शहरीकरण आणि पर्यावरण
नियमांमुळे या क्षेत्रात व्यवसायाच्या अभूतपूर्व संधी निर्माण झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर,
'अमृत' आणि 'कुशाग्र इनोव्हेशन्स फाउंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने "अमृत-सक्षम"
हा विशेष उद्योजकता विकास उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जात आहे.
रोजच्या कचऱ्यातून
नियमित उत्पन्न आणि शाश्वत व्यवसाय उभा राहू शकतो, हे अनेकांनी सिद्ध केले आहे. सुकलेल्या
फुलांपासून अगरबत्ती आणि धूप बनवणे. प्लास्टिक, कागद आणि काच रिसायकलिंग करणे. 'रिसोर्स
रिकव्हरी सेंटर' सुरू करणे. योग्य तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक मार्गदर्शन आणि बाजारपेठेची
जोड मिळाल्यास या क्षेत्रात स्वतःचा यशस्वी ब्रँड निर्माण करता येणे शक्य आहे.
'अमृत-सक्षम'
नेमके काय आहे?
हे केवळ एक पुस्तकी प्रशिक्षण नाही, तर
'संकल्पनेपासून ते प्रत्यक्ष उद्योग उभारणीपर्यंतचा' एक परिपूर्ण प्रवास आहे. यामध्ये
या व्यवसायामध्ये इच्छुक असलेल्या उमेदवाराला विविध गोष्टींचे टप्याटप्याने मार्गदर्शन
मिळेल. त्यामध्ये योग्य व्यवसायाची निवड करणे, आर्थिक नियोजन आणि बँक लोन प्रक्रिया
समजून घेणे, शासकीय योजना व अनुदानाचा लाभ घेणे. उत्पादनाची विक्री आणि बाजारपेठ मिळवणे.
कोण
सहभागी होऊ शकते?
या क्षेत्रातील कोणत्याही पूर्वानुभवाची
गरज नाही. खालीलपैकी कोणीही यात अर्ज करू शकतात. तथापि अमृत च्या लक्षित गटातील पात्र
उमेदवारांना अमृत संस्थेमार्फत विविध योजनांचे लाभ मिळू शकतात. स्वतःचा व्यवसाय सुरू
करू इच्छिणारे युवक-युवती महिला बचत गट,
विद्यमान व्यवसायाचा विस्तार करू इच्छिणारे व्यावसायिक, निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी,
सामाजिक संस्था व पर्यावरणप्रेमी नागरिक या उपक्रमात सहभागी होऊ शकतात.
प्रशिक्षणानंतर
काय मिळणार?
या प्रशिक्षणानंतर लाभार्थ्यांना विविध
क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाते. अमृतच्या लक्षीत गटातील पात्र
उमेदवारांना उद्योग उभारणीसाठी 'अमृत'च्या विविध योजनांतर्गत विशेष मदत. यामध्ये अमृत
वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा समावेश आहे. बाजारपेठेतील मोठे खरेदीदार आणि इतर उद्योजकांशी
थेट संपर्क करता येणार आहे.
नोंदणी
कशी करावी?
ऑनलाईन नोंदणीसाठी अमृत संस्थेच्या https://amrut-saksham.mahaamrut.org.in/ किंवा
अमृत च्या www.mahaamrut.org.in या
संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. यासंदर्भात इतर तपशील आणि माहितीसाठी अमृत संस्थेच्या
प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा व्यवस्थापक यांच्या कार्यालयाला भेट द्या किंवा अमृत संस्थेच्या
जिल्हा व्यवस्थापकांशी संपर्क साधून माहिती घ्यावी.
अधिक माहितीसाठी 9112227633 या क्रमांकांवर
संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment