पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेळाव्याचे १३ जुलैला आयोजन

 

आयटीआय झालेल्या उमेदवारांना संधी

 यवतमाळ, दि.9 (जिमाका) : पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेळावा जुलै २०२६ अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे दि. १३ जुलै  रोजी सकाळी १० वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 या मेळाव्यात रेमंड डेनिम यूको प्रा. लि., यवतमाळ, सारा स्पिनटेक, यवतमाळ तसेच एल. जी. बालकृष्णन जालान, एमआयडीसी, जालना या नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

 आयटीआयच्या विविध व्यवसायांमधून प्रशिक्षण घेत असलेल्या तसेच उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी या मेळाव्यात शिकाऊ उमेदवारीच्या विविध जागा उपलब्ध आहेत. याशिवाय अप्रेंटिसशिपचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनाही संबंधित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

  जिल्ह्यातील सर्व पात्र आयटीआय उमेदवारांनी या शिकाऊ उमेदवारीच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, प्राचार्य के. जे. नागोरे तसेच सहाय्यक शिक्षण सल्लागार आर. पी. कोडापे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित