तंत्रशिक्षण पदविका परीक्षेत यवतमाळच्या शासकीय तंत्रनिकेतनचे घवघवीत यश

 यवतमाळ, दि. 15 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी २०२६ परीक्षेत शासकीय तंत्रनिकेतन, यवतमाळ येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट निकालामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. या परिक्षेत अंतिम वर्ष संगणक शाखेतील सोहम हजारे हा ९४.०६ टक्के गुणांसह प्रथम आला असून आचल जाधव ९३.५३ द्वितीय, प्रथमेश कोटकर ९३.२९ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. अणुविद्युत शाखेतील संस्कृती खंडारकर ९४.०६ प्रथम, भूमिका मुंडे ९३.५४ द्वितीय, रोहिणी चव्हाण ९३.३१  टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. कृतिका विद्युत शाखेतील कृतिका भोयर ९२.७२ प्रथम, आयुष करवाडे ९२.६१ द्वितीय, श्रद्धा भांगे ९२.१७ टक्के गुणासह तृतीय क्रमांक प्राप्त केला. स्थापत्य शाखेतील मंदार बडवाईक ९१.३३ प्रथम, श्रावणी भोंग ९०.१७, नयन धोटे ८९.३९ टक्के  गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. यंत्र शाखेतील  तन्वी ताजणे  ८७.९४ प्रथम, आचल महल्ले ८६.३९, जयेश काळे ८५.५०  टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना दिले आहे. या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य ए. पी. मटाले, सर्व विभागप्रमुख अधिकारी, प्रबंधक व कार्यालयातील आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित