पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : यादीतील शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणिकरण करावे.
यवतमाळ दि. 28 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ या योजनेची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच राष्ट्रीयीकृत बँकेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. ही यादी ग्रामपंचायत, गावचावडी, सहाय्यक निबंधक, सहकार अधिकारी श्रेणी-१ तालुका ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था, बँका यांचे कार्यालयात, उपलब्ध असुन सर्व पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे नाव यादीमध्ये असल्याची खात्री करुन नावासमोरील विशिष्ठ क्रमांक, बँकेचे पासबुक, आधार कार्ड, आधार कार्डशी संलग्न मोबाईल यासह जवळचे सेतु सुविधा केंद्रावर जाऊन तात्काळ आधार प्रमाणिकरण करावे.
ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. अशा शेतकऱ्यांचे कर्जखात्यात कर्जमुक्ती लाभाची रक्कम लवकरच शासनामार्फत जमा करण्यात येणार आहे.
कर्जमुक्ती योजनेमध्ये पात्र असलेल्या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचे यादीत नाव पाहुन नाव आलेल्या सर्व शेतकऱ्यांनी त्वरीत जवळचे सेतु सुविधा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करावे व कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.
000

Comments
Post a Comment