रानभाजी-फळे विक्रेत्यांना १०० टक्के अनुदानावर मिळणार साहित्य रानभाजी-फळे विक्री प्रदर्शन मेळावा ; 30 जुलैपर्यंत अर्ज आमंत्रित

यवतमाळ दि. 28 : स्थानिक आदिवासी फळभाजी विक्रेत्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुसद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत "रानभाजी, रानफळे विक्री व प्रदर्शन मेळावा" आयोजित करण्यात येणार आहे. प्रकल्प कार्यक्षेत्रातील पुसद, उमरखेड, महागाव, आर्णी, दारव्हा, दिग्रस व नेर या तालुक्यातील आदिवासी विक्रेत्यांना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. मेळाव्यात सहभागी होणाऱ्या विक्रेत्यांना विक्रीसाठी आवश्यक असणारे स्टॉल, छत्री, वजनकाटा व कॅरेट हे साहित्य शासनाच्या १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रानभाजी महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इच्छुक आदिवासी राणभाजी विक्रेत्यांनी दि. ३० जुलै २०२६ पर्यंत प्रकल्प कार्यालय, पुसद येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित