वरुड जहागीर येथील तलाव मासेमारी ठेक्यासाठी जाहीर लिलाव; १५ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि.3 (जिमाका) : राळेगाव तालुक्यातील वरुड जहागीर येथील सरासरी ११३ हेक्टर जलक्षेत्राचा लघु पाटबंधारे तलाव सन २०२६-२७ ते २०३०-३१ या कालावधीसाठी जाहीर लिलावाद्वारे मासेमारीसाठी ठेक्याने देण्याची कार्यवाही नव्याने सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत, पात्र व मत्स्यव्यवसाय संस्थांकडून तलाव ठेका मागणी प्रस्ताव मागविण्यात आले आहे.
सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीसाठी अवधूत महाराज मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. झरगड ता. राळेगाव यांना ठेक्याने देण्यात आला होता. मात्र संबंधित संस्थेचा मासेमारी ठेका मुदतपूर्व रद्द करण्यात आला असून संस्थेला काळ्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. या निर्णयाविरोधात संस्थेने पुनर्विचार अर्ज दाखल केला असून प्रकरणाची सुनावणी सुरू असून अंतिम आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत.
जिल्हास्तरीय तलाव ठेका समितीच्या बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने ३ जुलै २०१९ च्या शासन निर्णयानुसार वरुड जहागीर तलावासाठी नव्याने जाहीर लिलावाची प्रक्रिया नव्याने करण्यात येत आहे. ही कार्यवाही न्यायालयीन प्रकरणातील अंतिम आदेशाच्या अधीन राहून करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील नोंदणीकृत, पात्र व इच्छुक मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी तलाव ठेक्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव १५ जुलैपर्यंत सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, पहिला मजला, जिल्हाधिकारी परिसर, यवतमाळ येथे सादर करावेत. या प्रक्रियेत पात्रतेचे निकष ३ जुलै २०१९ च्या शासन निर्णयानुसार राहतील, असे आवाहन मत्स्यव्यवसाय (तां.) सहाय्यक आयुक्त बा.मा.झाडे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment