प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

 यवतमाळ, दि. 9 (जिमाका) : भारत सरकारद्वारे ५ ते १८ वर्ष वयोगटातील बालकांना त्यांच्या शौर्याकरिता देण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 31 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. त्यासाठी https://www.awards.gov.in  या संकेतस्थळावर अर्ज करावे लागणार आहे.

  पुरस्काराबाबतच्या पात्रता व अटी संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पुरस्कारासाठी प्राप्त ऑनलाईन अर्जाच्या आधारे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय, नवी दिल्ली मार्फत चाळणी करून पात्र बालकांची निवड करण्यात येणार आहे व त्या बालकास प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देशाचे प्रधानमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

 जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक पात्र बालकांनी शौर्य पुरस्काराकरिता ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मारोती पवार यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित