आर्णी येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतीगृहाची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

यवतमाळ, दि. २ (जिमाका) : आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, आर्णी येथे सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. वसतीगृहाची एकूण क्षमता १२५ विद्यार्थीनी असून पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशासाठी विद्यार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. वसतीगृहात मोफत निवास, भोजन, निर्वाह भत्ता तसेच इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. शासनाच्या निकषांनुसार डीबीटी प्रणालीद्वारे आर्थिक लाभ थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल, आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, आर्णी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती