अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन

यवतमाळ दि. २८ : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचे स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे जयंती निमीत्य संपूर्ण महाराष्ट्रात दि. २२ ते दि. २८ जुलैपर्यंत विविध आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यवतमाळ श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत उईके, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेंद्र भुयार आणि जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. उमेश जोगे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माँ जिजाऊ नगर परिषद उच्चप्राथमीक शाळा व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद शाळा येथील सर्व मूलांना त्यांचे पालकांना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची माहिती देण्यात आली तसेच वैयक्तीक स्वछता, संतुलीत आहार, नियीमत व्यायाम, खेळ, संसर्गजन्य आजार मुलांचे लठ्ठपणा, उंची वजन मोजमाप, दृष्टी तपासणी, दंत तपासणी इत्यादी बाबींचे आरोग्य विषयक तपासणी करण्यात आली. तसेच शिबिरा दरम्यान ग्रामीण रुग्णालय कळंब येथेही सर्व्हायकल कॅन्सर, मुख कर्करोग, मधुमेह, हृदयरोग इत्यादी आरोग्य विषयक तपासणी करुन आढळलेल्या रुग्णांना उच्चस्तरीय तपासणीसाठी वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले. या शिबिरास नागरीक, विद्यार्थी, पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश पोहचवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. यात मुख्याद्यापिका वैजंती भेंडारकर, जिरकर, वंदना उईके यांनी हे शिबिर राबविण्यात महत्वाचा वाटा घेतला. जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. गजानन सोयाम, डॉ. पुष्पा लोकरे, डॉ. मोनीका मसारे तसेच सहाय्यक प्रध्यापक डॉ. आंचल रंगारी, डॉ. निखिलेश नागतोडे, डॉ. देवयानी वंजारी, स्त्री वैद्यकीय अधिकारी डॉ. संमृध्दी घाटोडे, डॉ. पुजा उत्तरवार, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे डॉ. अभिजीत कपिले तसेच समाजसेवा विभागाचे नोडल अधिकारी रविन्द्र निचळे आणि वरिष्ठ निवासी पदव्युत्तर विद्यार्थी, आंतरवासिता विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. 0000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित