१३ ते २७ जुलैदरम्यान पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन
सुरक्षा जवान, सुरक्षा सुपरवायझर, इलेक्ट्रीशियनसह ४५० पदांसाठी भरती
यवतमाळ, दि. 10 (जिमाका) : जिल्हा
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करिअर सेंटर तसेच
केरॉन्स सिक्युरिटी हेल्थ अॅन्ड कंपोझिट सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने
१३ ते २७ जुलै या कालावधीत जिल्ह्यात विविध
ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या विशेष भरती अभियानांतर्गत केरॅास सिक्युरिटी
हेल्थ अॅन्ड कंपोझिट सर्विसेस कंपनीमार्फत
४५० तरुण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून सुरक्षा जवान,
सुरक्षा सुपरवायझर, इलेक्ट्रीशियन आणि हाऊसकीपिंग इं पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
या पदांसाठी ५ वी, १० वी, १२ वी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण तसेच पदवीधर उमेदवार पात्र
राहतील.
तालुकानिहाय रोजगार
मेळावे होणार
पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे
आयोजन हे तालुकानिहाय करण्यात आले आहे. त्यानुसार १३ जुलै रोजी पंचायत समिती कार्यालय,
बाभुळगाव, १४ जुलै रोजी पंचायत समिती कार्यालय, आर्णी, १५ जुलै रोजी विद्याभवन कॉलेज
ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड रिसर्च, धामणगाव रोड, यवतमाळ, १७ जुलै रोजी पंचायत समिती कार्यालय,
पांढरकवडा, १८ जुलै रोजी पंचायत समिती कार्यालय, घाटंजी, २० जुलै रोजी पंचायत समिती
कार्यालय, मारेगाव, २१ जुलै रोजी पंचायत समिती कार्यालय, राळेगाव, २२ जुलै रोजी पंचायत
समिती कार्यालय, वणी, २३ जुलै रोजी पंचायत समिती कार्यालय, झरी जामणी आणि २७ जुलै रोजी
पंचायत समिती कार्यालय, महागाव येथे करण्यात येणार आहे.
या रोजगार मेळाव्याचा लाभ जिल्ह्यातील
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील तरुण-तरुणी, अल्पसंख्याक उमेदवार तसेच सुशिक्षित
बेरोजगार युवकयुवतींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुशील उचले यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी
इच्छुक उमेदवारांनी ९५८१८२५९०६, ९६१८०३५४२० या मोबाईल क्रमांकांवर किंवा कार्यालयाच्या
०७२३२-२४४३९५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment