पीक विम्यासाठी ‘इफ्को टोकियो’ जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड

 

            यवतमाळ, दि.7 (जिमाका) : चालु हंगामासाठी जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना पीएमएफबीवाय लागू करण्यात आली असून, या वर्षासाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांची अधिकृत विमा कंपनी म्हणून निवड करण्यात आली आहे.

            नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ तसेच कीड-रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

  विमा कुठे भरायचा ?

            जिल्ह्यासाठी केवळ इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीकडेच पीक विम्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शेतकरी आपल्या जवळील सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर), महा-ई-सेवा केंद्र, बँक तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत एनसीआयपी पोर्टलवर जाऊन पीक विमा भरू शकतात.

             शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. अंतिम मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे कोणत्याही अडचणीची वाट न पाहता शेतकऱ्यांनी वेळेत विमा भरून आपल्या पिकांना संरक्षण द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

           विमा भरताना अथवा पिकाच्या नुकसानीची माहिती देताना कोणतीही अडचण आल्यास संबंधित तालुक्यातील इफ्को टोकियो कंपनीच्या प्रतिनिधींशी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा. यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर कंपनीचे प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले असून, प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र संपर्क अधिकारी उपलब्ध आहेत.

  

जिल्हा प्रतिनिधी

  रवी अवधूत जाधव ९८34591028

 तालुकानिहाय संपर्क अधिकारी :

             यवतमाळ-गणेश ज्ञानेश्वर खैरकर  ८३७८०६९४०५, आर्णी-संतोष मोतीराम जाधव  ९३७०२०२२८८, बाभुळगाव-भूषण अरुणराव पिंगळे   ७७९८५९१२८०, दारव्हा-अझहरुल्ला खान  ७०५८७७६६३२, दिग्रस-शेख वजीद शेख मुनीफ  ९५९५१७०५५९ आणि शकील एम अमीन शेख. ९७६६७२५१३६, घाटंजी-निकेश गणेश वाडमिले  ८५५२०३८५५१, कळंब- सुबोध साहेबराव घाडले  ९१५८५१३७८७, केळापूर - पंकज निरंजन वासरीकर  ८८८८९८३०२४, महागाव - गुणवंत उत्तम राठोड  ९८३४१५९५३७, मारेगाव-  शुभम भास्करराव दुमोरे  ९९७५२०४२८५, नेर- हितेश प्रतापसिंग राठोड ८९८३७०९००५, पुसद- गणेश राजू जाधव  ९९२२६६३३५४ आणि  दत्ता राठोड  ८३८०९५५२९६, राळेगाव- स्वप्नील विलास केराम  ८७८८५९६४४५, उमरखेड- अभय प्रकाशराव  कदम  ८००७८६७७९५ आणि  उमेश सतिश बोबडे  ७२१९७०९६२७, वणी- सारंग लांबट  ७६६६६९८५७४, झरी जामणी- राजू ढोके  ८८८८१२८९६८ संपर्क अधिकाऱ्यांना संपर्क साधावा. तसेच शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी पीक विमा भरून नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळवावे, असे आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित