एनपीएस संचय आउटरीच कार्यक्रम उत्साहात

आर्थिक साक्षरता आणि सेवानिवृत्ती नियोजनाबाबत मार्गदर्शन पीएफआरडीए व जिल्हा अग्रणी बँक कक्षामार्फत आयोजन यवतमाळ, दि.३(जिमाका) : आर्थिक सुरक्षा आणि सक्षम सेवानिवृत्ती नियोजनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण आणि जिल्हा अग्रणी बँक कक्ष, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने २ जुलै रोजी राधा मंगलम हॉटेल येथे 'एनपीएस संचय आउटरीच कार्यक्रम' उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ क्षेत्रीय प्रबंधक सुनील पांडे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाबार्डचे अतुल इंगळे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पीएफआरडीएचे सचिन राठी आणि रघुवीर सिंह चरण उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी एनपीएस संचय योजनेचे महत्त्व, नियमित गुंतवणुकीद्वारे आर्थिक सुरक्षितता आणि सेवानिवृत्ती सन्मानपूर्वक जीवनासाठी या योजनेची उपयुक्तता याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक प्रशांत येकुडे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक माधव पालेपाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आनंद पिंगळे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी सुनील सोसे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुशील गरूड तसेच विविध बँकांचे अधिकारी, कॉमन सर्व्हिस सेंटर चालक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पीएफआरडीएचे राहुल यांनी सीएससी चालक आणि सहभागींसाठी संवादात्मक प्रशिक्षण सत्र घेतले. कार्यक्रमाचा समारोप अग्रणी जिल्हा व्यवस्थापक ज्ञानेश्वर टापरे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यांनी उपस्थित सहभागींचे आभार मानले. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे 'एनपीएस संचय आउटरीच कार्यक्रम' यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान