यशस्वी उद्योजकांना ग्रामोद्योग भरारी पुरस्कार मिळणार

                                      नामांकन अर्ज सादर करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 22 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ‘ग्रामोद्योग भरारी पुरस्कार २०२६’ साठी नामांकन अर्ज मागविण्यात येत आहेत. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विशेष करुन ग्रामीण भागात यशस्वी उद्योग उभारणाऱ्या तसेच रोजगारनिर्मितीत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या उद्योजकांचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.  या पुरस्काराचे चौथे वर्ष असून, पात्र उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संकल्पनेतुन उद्योगाच्या वृध्दीसाठी व उदयोगाला चालना व गती देण्यासाठी सन २०२३ पासून राज्यस्तरीय "ग्रामोद्योग भरारी पुरस्कार" सुरु करून माध्यमातून प्रथम, व्दितीय व तृतीय, उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येत आहेत.

मंडळामार्फत विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून उद्योग उभारून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या यशस्वी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी १३ जुलै  पासून ग्रामोद्योग भरारी पुरस्कार २०२६ साठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नामांकन अर्ज महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या www.mskvib.org या संकेतस्थळावर तसेच खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या जिल्हा कार्यालय, यवतमाळ येथे उपलब्ध आहेत. इच्छुक उद्योजकांनी आपले नामांकन अर्ज आवश्यक कागदपत्रांसह २८ जुलै  पूर्वी जिल्हा कार्यालयात सादर करावेत, असे मंडळाने कळविले आहे.पुरस्काराबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, यवतमाळ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित