आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहाची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

 

           यवतमाळ, दि. 14 (जिमाका) : शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी दिग्रस तालुक्यातील इसापूर येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहाची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. वसतिगृहातील रिक्त जागांवर मागील शैक्षणिक वर्षातील गुणवत्तेनुसार पात्र विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाणार आहे.

            या प्रवेश प्रक्रियेत इयत्ता आठवी, इयत्ता अकरावी, पदवी प्रथम वर्ष, पदव्युत्तर प्रथम वर्ष तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या पात्र आदिवासी विद्यार्थिनी अर्ज करू शकतात.

            प्रवेशासाठी विद्यार्थिनींनी www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज अचूक व परिपूर्ण भरावा. त्यानंतर अर्जाची मुद्रित प्रत आणि आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत संबंधित वसतिगृहात प्रत्यक्ष सादर करणे आवश्यक आहे.

            अधिकाधिक पात्र आदिवासी विद्यार्थिनींनी या शासकीय सुविधेचा लाभ घेऊन विहित मुदतीत प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन गृहपाल, आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, इसापूर ता. दिग्रस यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित