आदिवासी मुलांच्या वसतीगृहासाठी 10 हजार स्केअर फुट इमारतीची आवश्यकता
यवतमाळ, दि. 14 (जिमाका) : शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह क्र. 2, जुन्या यवतमाळ येथील 250 विद्यार्थ्यांकरीता एका विद्यार्थीसाठी 40 स्के.फु.प्रमाणे 10 हजार स्के.फुट बांधकाम असलेली एकमजली, दुमजली, तीनमजली, स्वतंत्र इमारत भाडे तत्त्वावर घ्यायची आहे.
नवीन इमारतीसाठी
अपेक्षित सुविधा पुढीलप्रमाणे असाव्यात : पाण्याची स्वतंत्र व्यवस्था, २५
स्नानगृहे व २५ शौचालयांची सोय, इमारतीला टाईल्स लावलेली असवी, दरवाजे व खिडक्या
सुस्थितीत असणे आवश्यक आहे. तरी इच्छुकांनी मोबाईल क्रमांक 8275395009 संपर्क
साधावा असे गृहपाल, शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह क्र. 2, यवतमाळ यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment