ग्रिष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

१० ते १७ वयोगटातील मुलामुलींसाठी निःशुल्क प्रशिक्षण शिबीर क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ग्रिष्मकालीन सॉफ्टबॉल क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबीराच्या माध्यमातून खेळाडुच्या सर्वांगिन विकास साधण्याचा प्रयत्न राहणार आहे. शिबीराच्या माध्यमातून खेळाचा प्रचार व प्रसार होण्यास मदत होईल, तसेच प्रतिभावान खेळाडूचा शोध घेवून दर्जेदार प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन अमोलकचंद कॉलेज, यवतमाळ व वामनदादा कर्डक मैदान, पाटीपुरा, यवतमाळ येथे सकाळी ६.३० ते ८.३० व सायंकाळी ५ ते ७ या दोन सत्रात दिनांक १ मे ते १० मे २०२६ या या कालावधी आयोजीत करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण शिबीर हे १० ते १७ वयोगटातील मुले व मुली करीता आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांमधील खेळाडूंनी या मोफत प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, शिल्पा चाबुकस्वार यांनी केले आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुक खेळाडूंनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच नोंदणीसाठी संपर्क (मंगेश गुडधे, सॉफ्टबॉल राज्य क्रीडा मार्गदर्शक यांना ९४०३८६६७५५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …