जिल्हाधिकाऱ्यांकडून क्रीडा सुविधा निर्मितीचा आढाव

जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न
जिल्हयात क्रीडा सुविधा निर्मितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल समितीची आढावा सभा बुधवारी संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी क्रीडा सुविधा निर्मितीचा आढावा घेतला. यात आझाद मैदान येथील जलतरण तलाव दुरुस्ती, फिल्टर प्लांट, सिंथेटिक हॅंन्डबॅाल मैदान, दुकान बांधकाम, ॲस्ट्रो टर्फ हॉकी मैदान इ. कामांबाबत आढावा घेवून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी दर्जेदार कामे झाली पाहिजेत, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. या बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, क्रीडा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जिल्हा क्रीडा संकुल भेट देवून प्रस्तावित कामांच्या जागेची पाहणी करुन आवश्यक सुधारणात्मक सूचना दिल्या.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …