डिजिटल जनगणनेत नागरिकांनाही स्व-गणना करता येणार

> १ मे पासून ऑनलाईन माहिती भरण्याची सुविधा ; > नागरिकांनी स्व-गणना सुविधेचा लाभ घ्यावा; > जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आवाहन यवतमाळ, दि. २३ : भारताच्या १६ व्या जनगणनेचे कामकाज सुरु झाले असून राज्यात १ मे पासून डिजिटल जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. त्याअंतर्गत शासनाने नागरिकांसाठी स्व-गणनेची सुविधा उपलब्ध करुन दिली असून नागरिकांनी आपल्या मोबाईलवरून स्व-गणना करुन राष्ट्रीय कार्यात सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे. या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात १ ते १५ मे या कालावधीत नागरिकांना ऑनलाईनरित्या स्व-गणना करता येणार असून या स्व-गणनेत नागरिकांना स्वत:सह कुटुंबांची माहिती भरता येणार आहे. त्यासाठी भारत सरकारच्या https://se.census.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून आपल्या मोबाईल क्रमांकाद्वारे लॅागीन करावे. त्यानंतर जिओ लोकेशन समाविष्ट करुन कुटुंबाबाबत विचारण्यात येणाऱ्या सर्व प्रश्नांची माहिती भरणे आवश्यक आहे. ही माहिती भरल्यानंतर त्याचा ११ अंकी एसई क्रमांक तयार झाल्यानंतर तो जतन करुन ठेवावा. हा ११ अंकी क्रमांक १५ मे नंतर घरभेटीसाठी येणाऱ्या प्रगणकाला देवून जनगणना प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे. तसेच या जनगणना मोहिमेतील स्व-गणना प्रक्रिया सुरक्षित, सुलभ व सोईस्कर आहे. जनगणनेचे संकेतस्थळ इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषेमध्ये उपलब्ध आहे. या मोहिमेत नागरिकांनी सक्रीय सहभाग घेवून स्व-गणना सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …