भरडधान्यासाठी खरेदीसाठी नऊ केंद्र सुरु

३० एप्रिलपर्यंत ऑनलाईन नोंदणीची मुदत यवतमाळ, दि. 7 :(जिमाका) रब्बी पणन हंगामांतर्गत राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी, बाजरी, मका व रागी या भरडधान्य खरेदीसाठी जिल्ह्यातील महागाव, पांढरकवडा,पाटण, पुसद, आर्णी,उमरखेड, घाटंजी व राळेगांव, या नऊ तालुक्यात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. खरेदी केंद्रांमध्ये तालुका खरेदी विक्री समिती महागांव, तालुका खरेदी विक्री समिती पांढरकवडा, बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था पाटण, पुसद तालुका खरेदी विक्री समिती पुसद, आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी, उमरखेड तालुक्यात खरेदी विक्री समिती उमरखेड,घाटंजी तालुक्यातील खरेदी विक्री समिती घाटंजी,कळंब तालुक्यात खरेदी विक्री समिती कळंब,राळेगांव तालुक्यात खरेदी विक्री समिती राळेगांव या केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ज्वारी, बाजरी, मका व रागी खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी भरडधान्य खरेदीकरिता शेतकरी करीता ऑनलाईन नोंदणीची मुदत 30 एप्रिल पर्यंत वाढविण्यात आलेली असुन प्रत्यक्षात भरडधान्य खरेदी 30 जुन पर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे संबंधित खरेदी केंद्रावर देवून भरडधान्य खरेदीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन प्र. जिल्हा मार्केटिंग अधिकारी विजय एस.गाढवे,यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …