डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ
8 ते 14 एप्रिलपर्यंत आयोजन
विविध योजनेतील लाभार्थ्यांना लाभ वितरित
यवतमाळ, दि.8 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. ८ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘सामाजिक समता सप्ताह’ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाचे उद्घाटन बुधवारी मोठ्या उत्साहात करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उपायुक्त तथा, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सदस्य प्राजक्ता इंगळे ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक विशाल नगराळे, तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या संशोधन अधिकारी ज्योत्स्ना तिजारे उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मंगला मून यांनी सामाजिक समता सप्ताहाच्या उद्देशाविषयी माहिती देताना सांगितले की, समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण व शहरी भागातील मागासवर्गीय विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांचा शैक्षणिक व सामाजिक दर्जा उंचावणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
कार्यक्रमादरम्यान विविध योजनांअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ वाटप करण्यात आले. यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत गौरव खेकचंद बडोले, दिपक सिद्धार्थ गजभिये, ऐश्वर्या प्रमोद चालखुरे, यश गंगाधर गजभिये व भारत सरकार मॅट्रिकोत्तर परराज्य शिष्यवृत्ती योजनेंतर्गत उज्वला छत्रपती बनसोड, श्रेया श्याम नगराळे, निलेश सुनील बरडे तसेच छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेंतर्गत श्वेता राजेंद्र बन्सोड व प्रेरणा दिपक सावळे यांना लाभ देण्यात आला.
या सामाजिक समता सप्ताहातील सर्व कार्यक्रम दि. ८ ते १४ एप्रिल दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे दररोज सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण निरीक्षक अश्विनी राऊत व त्यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत रुपेश वानखेडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्योत्स्ना तिजारे यांनी केले.

Comments
Post a Comment