अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळणार

 पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाकडे ३० एप्रिल २०२६ पर्यंत अर्ज सादर करा  प्रकल्प अधिकारी रेवैय्या डोंगरे यांचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा अंतर्गत केळापूर, घाटंजी, वणी, मारेगाव, झरी, राळेगाव, कळंब, बाभूळगाव व यवतमाळ या तालुक्यांतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शहरातील नामांकित इंग्रजी माध्यम निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध असून, विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ३० एप्रिल २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी रेवैय्या डोंगरे यांनी केले आहे. या योजनेसाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा, तसेच पालकांचे वार्षिक उत्पन्न कमाल १ लाखांपर्यंत असावे. विद्यार्थ्याचे वय ६ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, अंगणवाडी/ग्रामसेवक प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. दारिद्र्यरेषेखालील, विधवा, घटस्फोटीत, निराधार किंवा परित्यक्त्या पालकांच्या पाल्यांना प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच पालक शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसावेत, अशी अट आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चित झाल्यानंतर शाळा बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. खोटी माहिती दिल्यास प्रवेश रद्द केला जाईल.अर्ज संबंधित नामांकित शासकीय/अनुदानित शाळांचे मुख्याध्यापक तसेच प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा यांच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. सहायक जिल्हाधिकारी,तथा प्रकल्प अधिकारी रेवैयाह डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …