नाफेडचे सहा चना खरेदी केंद्र सुरु

यवतमाळ, दि. 7 :(जिमाका) : खरीप पणन हंगामांतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत चना खरेदीसाठी नाफेडमार्फत जिल्ह्यातील महागाव, पांढरकवडा, दिग्रस, पाटण, पुसद व आर्णी या सहा ठिकाणी खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. खरेदी केंद्रांमध्ये तालुका खरेदी विक्री संघ मर्या. महागांव, तालुका खरेदी विक्री संघ मर्या. पांढरकवडा, खरेदी विक्री संघ मर्या दिग्रस, बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था मर्या.पाटण, पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु), पुसद व शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी या केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यातील चना खरेदी ही 15 एप्रिलपर्यंत करण्यात येणार असून चना खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, 7/12 उतारा, पिकपेरा व बॅकेचे पासबुकची झेरॉक्स प्रत ही आवश्यक कागदपत्रे संबंधित खरेदी केंद्रावर स्वत: हजर राहून नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी प्र. विजय गाढवे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान