विशेष वृत्त : गर्भवती मातांसाठी ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’
५-६ हजार रुपये आर्थिक सहाय्य ; थेट खात्यात रक्कम
यवतमाळ, दि. 20: केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून गर्भवती महिलांना थेट त्यांच्या बँक खात्यात आर्थिक सहाय्य दिले जात आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डिबीटी) प्रणालीद्वारे अनुदान वितरित केले जात आहे.
केंद्र सरकारच्या १४ जुलै २०२२ च्या निर्णयानुसार योजनेत बदल करण्यात आला असून, पूर्वी केवळ पहिल्या गर्भधारणेसाठी मर्यादित असलेला लाभ आता विस्तारण्यात आला आहे. १ एप्रिल २०२२ नंतर दुसऱ्या अपत्यात मुलगी जन्माला आल्यास त्या लाभार्थी महिलांनाही योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.
आर्थिक लाभ
या योजनेअंतर्गत पात्र महिलेला पहिल्या अपत्यासाठी एकूण रु. ५००० दोन हप्त्यांत तर दुसऱ्या अपत्यात मुलगी जन्मल्यास रु. ६००० एकरकमी आर्थिक सहाय्य दिले जाते. ही रक्कम आधार-संलग्न बँक किंवा पोस्ट खात्यात थेट जमा केली जाते.
पात्र लाभार्थी
• पहिल्या अपत्यासाठी गर्भवती महिला
• दुसऱ्या वेळेस मुलीला जन्म देणाऱ्या महिला
उद्देश
या योजनेचा मुख्य उद्देश गरोदर मातांना सकस आहारासाठी आर्थिक मदत देणे तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हा आहे.
अर्ज प्रक्रिया
लाभ घेण्यासाठी महिलांनी जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा. आशा कार्यकर्त्या, आरोग्य सेविका किंवा अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0000

Comments
Post a Comment