जिल्हाधिकारी विकास मीना यांचा राज्यस्तरीय सन्मान होणार

सेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी “अभिप्राय कक्ष” हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी विकास मीना यांचा राज्यस्तरीय सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात येणार आहे. “द्वितीय सेवा हक्क दिन” निमित्त सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आला असून मुख्य आयुक्त, महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. “अभिप्राय कक्ष” या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे नागरिकांना अधिक संवेदनशील, पारदर्शक व तत्पर सेवा देणे शक्य झाले असून, त्यास व्यापक प्रतिसाद व यश मिळाले आहे. या उपक्रमाद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण झाला असून, त्यातून प्रशासनातील सेवा वितरण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडण्यास मदत झाली आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथील सभागृहात मुख्य सचिव यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विकास मीना यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. या सोहळ्यास वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून, हा सन्मान राज्यातील नावीन्यपूर्ण व लोकाभिमुख प्रशासनाला प्रोत्साहन देणारा ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान