छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान ;

उत्कृष्ट पाच मंडळ अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार यवतमाळ, दि. 9 (जिमाका) : “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियानाअंतर्गत जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या 14 मार्चच्या दुसऱ्या टप्प्यातील शिबिरांचे गुणांकन पूर्ण झाले असून त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील पाच मंडळांची निवड करण्यात आली आहे. प्राप्त गुणांनुसार झरी जामणी तालुक्यातील खडकडोह मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यवतमाळ तालुक्यातील लोहारा मंडळाने द्वितीय क्रमांक मिळविला असून राळेगाव तालुक्यातील वाढोणा (बा) मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला आहे. तसेच पुसद तालुक्यातील जांबबाजार मंडळाने चौथा तर केळापूर तालुक्यातील करंजी मंडळाने पाचवा क्रमांक पटकावला आहे. उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल खडकडोह मंडळाचे मनोज चवरे, लोहारा मंडळाचे विनोद अक्कलवार, वाढोणा (बा) मंडळाचे गाईड चव्हाण, जांबबाजार मंडळाचे संजय मारकड आणि करंजी मंडळाचे अमोल गुघाने या मंडळ अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी विकास मीना यांनी प्रशस्तीपत्र देवून सत्कार केला. दरम्यान, इतर मंडळांनी पुढील टप्प्यांमध्ये अधिक चांगली कामगिरी करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. शुक्रवारी 10 एप्रिल रोजी आयोजन छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत पहिला टप्पा 7 मार्च ते 1 एप्रिल पर्यंत चार शिबिरे पार पडले असून पाचवा टप्पा हा 10 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. या टप्प्यात मोहा, घारफळ, सावळी, लाडखेड, वटफळी, ब्राम्हणगांव, विडुळ, गुंज, पहापळ, घोटी, पुनवट, जळका बो, झाडगाव आणि कोठा येथे शिबिरे होणार आहेत. त्यानंतर 17 एप्रिल, 29 एप्रिल, 8 मे, 15 मे आणि 22 मे 2026 या कालावधीत जिल्ह्यातील इतर महसूल मंडळांमध्ये टप्प्याटप्प्याने शिबिरे पार पडणार आहेत. या शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …