पारधी समाजातील युवक, शेतकऱ्यांसाठी विविध कार्यशाळा योजना

30 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद यांच्या वतीने सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून आवेदन अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पुसद, दिग्रस, आर्णी, दारव्हा, उमरखेड आणि नेर या तालुक्यांचा समावेश असून, या भागातील पारधी समाजातील युवक व शेतकऱ्यांसाठी विविध व्यावसायिक कार्यशाळा व शेती मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी शेळीपालन व कुक्कुटपालन व्यवसायाचे निवासी कार्यशाळा, इलेक्ट्रीशियन व प्लंबिंग व्यवसायिक निवासी कार्यशाळा, तसेच सोलर पॅनल इन्स्टॉलेशन व मेंटेनन्स संदर्भातील निवासी कार्यशाळांचा समावेश आहे. याशिवाय शेतकऱ्यासाठी आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान व जैविक शेतीविषयी मार्गदर्शन कार्यशाळाही आयोजित करण्यात येणार आहेत. या योजनांसाठी अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद (उपजिल्हा रुग्णालयाजवळ, संत सेवालाल चौक) येथे उपलब्ध आहेत. इच्छुक लाभार्थ्यांनी ३० एप्रिल २०२६ पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. निर्धारित कालावधीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. लाभार्थ्यांसाठी आवश्यक अटींमध्ये अर्जदार पारधी समाजातील असणे, प्रकल्प क्षेत्रातील रहिवासी असणे, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, आधारकार्डाची प्रत तसेच शैक्षणिक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे अशी माहिती प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद अमोल मेतकर यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …