जिल्हा पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेची राष्ट्रीय मान्यता मंडळाच्या नूतनीकरणात उल्लेखनीय कामगिरी

राष्ट्रीय मान्यता २० घटकांपर्यंत करणारी राज्यात पहिली प्रयोगशाळा भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा अंतर्गत जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेने राष्ट्रीय मान्यता मंडळाच्या नूतनीकरण प्रक्रियेत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. दि. १८ व १९ एप्रिल रोजी प्रयोगशाळेत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार दोन दिवसीय तपासणी यशस्वीरित्या पार पडली. या तपासणीसाठी प्रमुख परीक्षक रजनीकांत शर्मा तसेच तांत्रिक परीक्षक ज्योती पाठक आणि रीतेश कमाल सिंह यांनी प्रयोगशाळेला भेट देऊन कामकाजाची सखोल पाहणी केली. यावेळी गुणवत्ता मार्गदर्शिका, मानक कार्यपद्धती, उपकरणांचे अंशांकन नोंदी, नमुना हाताळणी प्रक्रिया तसेच चाचणी पद्धतींची सविस्तर तपासणी करण्यात आली. नमुना तयारी आणि चाचणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. तपासणीदरम्यान गुणवत्ता व्यवस्था, उपकरणांची अचूकता, नोंदींची शिस्तबद्धता तसेच कर्मचारी वर्गाची कार्यक्षमता यांचा बारकाईने आढावा घेण्यात आला. या वेळी वरिष्ठ भूवैज्ञानिक नितीन तट्टे, गुणवत्ता व्यवस्थापक अतुल सुरसे, तांत्रिक व्यवस्थापक स्नेहा खडसे, तसेच रसायनी विशेष राठोड, हर्षदा राऊत आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. या तपासणीतील महत्त्वाची बाब म्हणजे प्रयोगशाळेची राष्ट्रीय मान्यता वाढवून रासायनिक घटकांची संख्या १६ वरून १८ करण्यात आली असून, त्यासोबत २ जैविक घटकांचा समावेश करून एकूण २० घटकांपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी गुणवत्ता तपासणी अधिक व्यापक व परिणामकारक होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी प्रयोगशाळा सहायक मनीषा दिघाडे, अमोल गारचेलवार, निलेश पवार, डेटा एंट्री ऑपरेटर विश्वनाथ इंगोले, प्रयोगशाळा मदतनीस रविंद्र मोहोड तसेच कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या संयुक्त प्रयत्नांमुळे ॲाडिट यशस्वीपणे पूर्ण पार पडले.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …