२६ एप्रिलला महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक

>वैद्यकीय महाविद्यालयात पाच मतदान केंद्र ; मतदार यादी प्रसिद्ध यवतमाळ, दि. २३ : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक २०२६ येत्या २६ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पार पडणार असून, या निवडणुकीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील २०४२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे पाच मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्र क्रमांक १ डेमॉन्स्ट्रेशन हॉल क्रमांक १ येथे मतदार क्रमांक १ ते ४००, मतदान केंद्र क्रमांक २ डेमॉन्स्ट्रेशन हॉल क्रमांक २ येथे मतदार क्रमांक ४०१ ते ८००, मतदान केंद्र क्रमांक ३ लायब्ररी कम सेमिनार रूम येथे मतदार क्रमांक ८०१ ते १२००, मतदान केंद्र क्रमांक ४ एफएमटी म्युझियम हॉल क्रमांक १ येथे मतदार क्रमांक १२०१ ते १६००, तर मतदान केंद्र क्रमांक ५ एफएमटी म्युझियम हॉल क्रमांक २ येथे मतदार क्रमांक १६०१ ते २०४२ यांची मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारांची यादी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, मतदारांनी आपला मतदान केंद्र क्रमांक आणि इतर तपशील संकेतस्थळावरून तपासून घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मतदानासाठी येताना मतदारांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून देण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र किंवा भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेले छायाचित्रासह ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. योग्य ओळखपत्राशिवाय मतदान करता येणार नसल्याने सर्व मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह मतदान केंद्रावर उपस्थित राहावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विकास मीना यांनी आवाहन केले आहे. मतदार यादी : https://www.maharashtramedicalcouncil.in/.../YAVATMAL.pdf 0000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …