शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

यवतमाळ, दि.13 (जिमाका) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे दिनांक १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील विविध नामांकित उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून त्यामध्ये रेयमंड डेनिम, युको प्रायव्हेट लिमिटेड यवतमाळ, चिद्धरवार कन्स्ट्रक्शन कंपनी यवतमाळ, एनव्हीके माहिती तंत्रज्ञान व सुरक्षा प्रायव्हेट लिमिटेड यवतमाळ तसेच छत्रपती संभाजीनगर येथील बिर्ला प्रिसिजन टेक्नॉलॉजीज, देवगिरी फोर्जिंग्स, एनआरबी बेअरिंग्ज पुणे आणि पियाजिओ लिमिटेड आदी कंपन्यांचा समावेश आहे. या मेळाव्यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विविध व्यवसायातील उमेदवारांसाठी जागा उपलब्ध आहे. शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनाही संबंधित उद्योगांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य व्ही. जे. नागोरे व सहाय्यक प्रशिक्षण सल्लागार आर. पी. कोडापे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …