जवाहर नवोदय विद्यालय बेलोराचा १० वीचा निकाल १०० टक्के

पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय बेलोरा येथील शैक्षणिक सत्र २०२५-२६ चा सीबीएसई १० वीचा निकाल १०० टक्के लागला आहे. दिनांक १५ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या या निकालात विद्यालयातील एकूण ७६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून, त्यापैकी ७५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच ६५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे. विद्यालयातून सात्विक गजानन गुंडेवार याने ९७.५० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. राज मंगेश गादेवार याने ९७.३३ टक्के गुणांसह द्वितीय, तर शिवम मनोहर काळे याने ९६.५० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. विद्यार्थ्यांनी वैयक्तिक विषयातही उत्तम कामगिरी केली आहे. एकूण ७६ पैकी ५४ विद्यार्थ्यांनी मराठी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून विक्रम प्रस्थापित केला. तसेच कौशल विकास अंतर्गत 'फिजिकल ॲक्टिव्हिटी ट्रेनर' या विषयात ३७ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत. या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य कमलाकर दे. घोपटे, उपप्राचार्य सुनील उराडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …