सहकारी आदिवासी विकास महामंडळ ट्रक वाहनांचा ई-लिलाव

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यवतमाळ कार्यालय अंतर्गत ट्रक वाहनांचा 7 मे 2026 रोजी दुपारी 12 ते 5 या वेळेत ई-लिलाव करण्यात येणार आहे.इच्छुकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. ट्रक क्रमांक एम एच १५ ईजी २०३१ खरेदी वर्ष १८ जुलै २०१४ अनामत रक्कम २५ हजार ट्रक क्रमांक एम एच १५ ईजी २०३२ खरेदी वर्ष १८ जुलै २०१४ अनामत रक्कम २५ हजार ट्रक क्रमांक एम एच १५ईजी २०३३ खरेदी वर्ष १८ जुलै २०१४ अनामत रक्कम २५ हजार ट्रक क्रमांक एम एच १५ ईजी २०३४ खरेदी वर्ष १८ जुलै २०१४ अनामत रक्कम २५ हजार ट्रक क्रमांक एम एच १५ ईजी २०३५ खरेदी वर्ष १८ जुलै २०१४ अनामत रक्कम २५ हजार हि वाहने ई-लिलावात विक्रीस ठेवण्यात येत आहेत. www.market.neml.in या Neml च्या पोर्टलवर विक्री करण्यात येत आहे. तेव्हा लिलावाच्या अटी/शर्ती पुढील प्रमाणे आहेत. सदर ई-लिलाव वाहने नियमानुसार आदिवासी भागातील आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार अवजड परवानाधारक गरजु व होतकरु बांधवांना आयेजीत करण्यात येत आहे. लिलावामध्ये जे आदिवासी बांधव सहभागी होतील अशा बांधवाकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे अनिवार्य राहील. वाहने विक्री केल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करुनच वाहने हस्तांतरित करण्यात येतील. तसेच वाहन ज्या स्थितीत आहे.त्या स्थितीत घ्यावे लागेल. अंतिम बोली मंजुर नामंजुर करण्याचा व निर्णय घेण्याचा अधिकार प्रादेशिक व्यवस्थापक यवतमाळ यांनी राखुन ठेवलेला आहे.लिलावाशी संबंधीत सर्व बाबतीत प्रादेशिक व्यवस्थापक यांचा अंतिम निर्णयबंधनकारक राहील. सदर ई- लिलावावातील इतर अटी-शर्ती www.market.neml.in या एनइएमएल च्या पोर्टवर उपलब्ध होतील. या संपर्कासाठी राजरतन बागडे मो.८४२१५४९८४२ संदेश वर्मा मो. ९३२५४४०६३९ यांच्याशी संपर्क साधावा.असे प्रादेशिक व्यवस्थापक आम्रपाली बनसोडे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती